भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

खळबळजनक : तुळजाभवानी मातेच्या मंदिरा नंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातून सोने-चांदीचे ३१४ दागिने गायब?

पंढरपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थांन असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ३१४ सोन्या-चांदीचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक अ‍ॅड. सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर धक्कादायक आरोप केले आहेत. एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे. श्री विठ्ठलाचे २०३ आणि रुक्मिणी मातेच्या १११ दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झालं आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असला प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

लेखापरीक्षकांना रजिस्टर दाखवले नाही तर लेखा परीक्षण का केले? असा सवाल करण्यात आला आहे. आम्हाला ३१५ दागिने दिले नाहीत असं लेखापरीक्षकांचा अभिप्राय आहे. दागिने सील करून ठेवले जात नाहीत. दागिने सील न केल्याने दागिने गायब करण्याला किंवा बदलण्याला वाव मिळतो. देणगी मोजताना बाहेर सुरक्षा रक्षक नेमला नाही, असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.

समिती बरखास्त करून अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
“शौचालय बांधण्यासाठी रेल्वेची जागा भाड्याने घेतली आणि २२ लाख ६ हजार ५७५ रुपये दिले. पण शौचालय बांधले नाही. सरकारने २०१६ पासून नियुक्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. समिती बरखास्त करा आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करा”, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!