मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी पंकज कपले, उपाध्यक्षपदी अक्षय काठोके तर सचिवपदी विठ्ठल धनगर यांची निवड
मुक्ताईनगर , मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आज मुक्ताईनगर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींची बैठक पार पडली , या बैठकीमध्ये मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली, यावेळी एकमताने या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून लाईव्ह ट्रेड न्यूज चे पंकज कपले यांची तर मंडे टू मंडे न्यूज चे अक्षय काठोके यांची उपाध्यक्षपदी व उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुक्ताईनगर शहर आणि तालुक्याला खूप मोठा राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे, या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे वृत्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आज इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली, यावेळी तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पंकज कपले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्ष म्हणून अक्षय काठोके यांची नियुक्ती करण्यात आली, सचिव म्हणून विठ्ठल धनगर यांचे नियुक्ती करण्यात आले, तर खजिनदार सचिन झनके यांची नियुक्ती करण्यात आली, या पत्रकार संघाच्या सल्लागारपदी प्रमोद सौंदळे व दत्तात्रय गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. झालेल्या या बैठकीसाठी अतिक खान, कैलास कोळी, पंकज तायडे, रवी गोरे, देव गायकवाड, दीपक माळी, सुमित बोदडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.