एक महिन्याच्या बाळाला रेल्वेच्या डब्यात सोडून आई – वडील पसार
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ – सुरत पॅसेंजरमध्ये धरणगाव रेल्वे स्थानकावरून रेल्वे डब्यात बसलेल्या आई – वडिलांनी अवघ्या १ महिन्याच्या बाळाला टाकून अमळनेर स्थानकावरून पसार झाल्याची घटना दिनांक ९ रोजी रात्री घडली.
भुसावळ – सुरत पॅसेंजर मध्ये सर्वसाधारण बोगीत एक जोडपे धरणगाव रेल्वे स्थानकावरून एक महिन्याच्या बाळाला घेऊन बसले होते. सर्व प्रवाशांसमोर त्यांनी आपल्या बाळासाठी डब्यातच झोकाही बांधला.
मात्र अमळनेर रेल्वे स्टेशन येताच बाळाला सोडून दोन्ही पती- पत्नी उतरून पसार झाले. हा प्रकार सोबतच्या प्रवाशांच्या
रेल्वे दोंडाईच्या पर्यंत गेल्यावर लक्षात आला. त्यांनी लागलीच रेल्वे पोलिसांना बोलावून सदरची घटना सांगितली. रेल्वे पोलीस अनिता चौधरी, व अलका अढाळे यांनी बाळाला नंदूरबार रेल्वे स्थानकावर उतरवून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत नंदुरबार रेल्वे स्थानकात अनिता चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास अलका अढाळे करीत आहेत. अमळनेर पोलिस बळाच्या आई जी वडिलांचा शोध घेत आहेत.