शेत जमिन संगनमत करून अवैधरित्या हडप केल्या प्रकरणी क्षत्रिय मराठा परिवाराचे तहसीलदार यांना निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पारोळा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रत्नापिप्री पारोळा येथील निंबाबाई हिम्मत पाटील यांच्या मालकीची व कब्जा उपभोगातील शेत जमिन अवैधरित्या त्याच्याच गावातील ईतर ईसमानी दुय्यम निबंधक व तलाठी याच्याशी संगणमत करून बेकायदेशीर रित्या अन्याय करून त्याचा कायदेशीर हक्क व अधिकार डावललेला आहे. त्यांचा हक्क व अधिकार व बोगस खरेदी खत रद्द व्हावे या करीता क्षत्रिय मराठा परिवाराचे कार्यकारी व किसान मोर्चा प्रमुख व जळगाव जिल्हा प्रमुख यांनी तहसीलदार यांना निवेदन व तक्रारी अर्ज देण्यात आला यावेळी उत्तर महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख भाऊसाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा प्रमुख अनिल पाटील, जळगाव जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, व पारोळा तालुका किसान मोर्चा प्रमुख,प्रदीप सोनवणे, पारोळा शहर प्रमुख ईश्वर पाटील व इ. पदाधिकारी उपस्थित होते निंबाबाई हि विधवा स्त्री असुन त्यांची अतिशय गरिबीची व हालाकिची परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील होणाऱ्या दिवाणी स्वरूपातील न्यायालयीन कामासाठी अॅड भाऊसाहेब पाटील यांनी माणुसकीची भावना जपत न्यायालयीन कामकाजा संबधी निंबाबाई हिम्मत पाटील यांच्याकडून कोणतीही फी न आकारता कामकाज बघणार असल्याचीअवैधरित्या ग्वाही दिली.