महाराष्ट्र

ब्रेकिंग : धावत्या रेल्वेतून दारावर लटकलेले प्रवासी ट्रॅकवर पडले ; ६ प्रवाशांचा मृ्त्यू

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मध्य रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाडला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले.त्यातील सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बरेच प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते.

दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान ट्रेन आल्यानंतर प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान ट्रेन आल्यानंतर प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल आठ ते बारा प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. सोमवार (९ जून) सकाळी घडली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

ANI ने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांना जाणाऱ्या प्रवाशांनी लोकलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत काही प्रवासी दरवाजावर उभे होते. गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे संतुलन बिघडून तब्बल आठ ते बारा प्रवासी खाली पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून, ट्रेनमधील अत्याधिक गर्दीमुळे दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!