भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथे “श्री स्वामींनारायण” मंदिरात १६ तारखे पासून पाटोत्सव..!

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वडतालधाम द्विशताब्दी महोत्सव अंतर्गत, श्री स्वामिनारायण मंदिर सावदा द्वारा आयोजित, ११० वा पाटोत्सव सोहळा दिनांक १६ रविवार, “श्रीहरी अंतर्धान दिवस” या दिवशी मंदिराचा ११० वा पाटोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला असून त्या दिवशी ५६ भोग नैवेद्य दाखवला जातो.


सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने ,
दिनांक १५ शनिवार,
संध्याकाळी ५;३० वाजता कलश यात्रा विठ्ठल मंदिर ते स्वामिनारायण मंदिर अशी निघणार आहे. तरी हरी भक्तांनी त्या प्रसंगी उपस्थित राहावे.                                त्याचप्रमाणे दिनांक १६
रविवार या दिवशीसकाळी ६;३० ते ७ या काळात
भगवत पूजन होईल.
७ ते ८;४५ अभिषेक दर्शन
९ ते १० सत्संग सभा
१०; १५ अन्नकूट आरती
१०;३० वाजता महाप्रसादाचे वाटप होईल,
तरी सर्वांनी या सोहळ्याच्या निमित्ताने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजक कोठारी व विश्वस्त श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा यांनी आव्हाहन केले आहे .

केशरजल, पंचामृताने होणार मंगल अभिषेक
पाटोत्सव म्हणजे मंदिराचा वर्धापन दिवस असतो. त्याला वार्षिक कार्यक्रम असेही संबोधले जाते. त्यात अभिषेक दर्शनामध्ये पवित्र नद्यांचे शुद्ध जल, केशर जल, फळांचा रस, पंचामृताने देवांचा अभिषेक होतो. हा विधी तासभर चालतो. यानंतर अन्नकूट कार्यक्रम होतो. त्यात देवाला ५६ भोग नैवेद्य दाखवला जातो. त्यात सर्व प्रकारची व्यंजने असतात. नंतर सत्संग होतो. सत्संग झाल्यावर छपन्न भोग आरती होते, अशी माहिती शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!