ऐनपुर ग्राम पंचायत उपसरपंच पदी पवन भाऊ पाटील यांची निवड
ऐनपूर, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज. विजय के अवसरमल | रावेर तालुक्यातील ऐनपूर ग्राम पंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली असून या निवडणुकीत पंकज/पवन गोविंदा पाटील हे निवडून आले.
सविस्तर वृत असे की रावेर तालुक्यातील ऐनपूर ग्राम पंचायत मध्ये आज दिनांक ,२८- ४ – २०२५ रोजी उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली अध्यक्ष सरपंच अमोल महाजन होते निवडणुक निर्णय अधिकारी ग्राम विकास अधिकारी सुनिल गोसावी हे होते सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते उपसरपंच पदासाठी एकुण तीन अर्ज भरण्यात आले होते परंतु सतिष अवसरमल यांनी माघार घेतल्यामुळे एकुण दोन अर्ज बाकी राहीले त्यामुळे पंकज ( पवन ) पाटील व किशोर पाटील याच्या सरळ लढत झाली.
या लढतीत दोन्ही उमेदावारना सात सात मत मिळाल्या मुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली ईश्वर चिठ्ठी पंकज (पवन ) गोविदा पाटील यांच्या नावाची निघाल्यामुळे त्याची उपसरपंच पदी . निवड करण्यात आली त्यांना शाल व फुलगुश देऊन त्याच अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील नागरीक व कर्मचारी पत्रकार उपस्थित होते पवन भाऊ पाटील यांच्या निवडी बदल सर्व गावतुन अभिनंदन होत आहे