पाडळसा येथे पवनदास महाराज यांचा सत्कार सोहळा संपन्न
पाडळसे, ता.यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l फैजपूर येथील खंडेराव महाराज मंदिरातील पवनदास महाराज यांना 1008 महामंडलेश्वर पदवी मिळाल्याबद्दल पाडळसा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमात भरत चौधरी, योगेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, योगेश कोळी, सचिन कोळी, ओमगिरी, तुषार कोळी, देवा कोळी, शुभम कोळी यांनी आपली उपस्थिती दर्शवली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पवनदास महाराज यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील अध्यात्मिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. त्यांच्या सन्मानाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.