भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

Breaking : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून सिक्युरीटी गार्डच्या नोकरीसाठी ३० हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरीटी गार्डच्या नोकरीसाठी अर्ज केलेल्या तक्रारदाराकडे कार्यालयातील शिपाई यानें कार्यालयातील वरीष्ठांशी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगून विश्वास संपादन करीत २ लाख १० हजारांची मागणी केली होती यात पहिल्या टप्प्यात सोमवारी ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते मात्र, याबाबत लाचलुचपत} प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्याने एसीबीच्या पथकाने सापळा लावत ३० हजारांची लाच स्वीकारतांना पथकाने रंगेहात अटक करण्यात आली.

सदरील कारवाई एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!