फैजपूर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा ५ लाखासाठी छळ
फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथिल माहेरवाशीण असलेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील सहा जणांविरोधात फैजपूर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मध्यप्रदेशातील रवि जानकर चिमणकर, रा. बाणगंगा, भोपाल यांच्याशी विवाह झालेल्या फैजपूर येथील सोनल रवी चिमणकर (वय-२९) यांना २४ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत पती रवी चिमणकर यांने विवाहितेला शिवीगाळ करत असतात तसेच घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी पतीसह सासू, सासरे, तीन नंदा यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाणमारहाण केली. तू पैसे आणले नाही तर तुला नांदविणार नाही अशी धमकी विवाहितेला दिली. हा सर्व त्रास सहन न झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी फैजपूर येथे निघून आली यानंतर फैजपूर पोलीस स्थानक गाठत मंगळवारी तक्रार दिल्याने पती रवि चिमणकर, सासू इंदूबाई चिमणकर, सासरे जानकर चिमणकर,सर्व रा. भोपाल, नणंद राखी खिरोडकर,रा. रायपूर छत्तीसगड, लता वानखडे, रा. जळगाव, माया साखरे ,रा. शेंदुणी जामनेर, अश्या सासरच्या ६ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.