भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून ६ लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। रिंगरोड परिसरात माहेरी राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला भडगाव येथील सासरच्या मंडळींनी ६ लाख रूपयांसाठी मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांन विरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वृत्त असे की, एका २४ वर्षीय विवाहितेचे सासर भडगाव येथील आहे. तर जळगावला रिंगरोड परिसरात माहेर असून लग्न झाल्यापासून सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती देवाजी शिवाजी पाटील यांना सतत टोमणे मारणे सुरू केली. तसेच सासु कौशल्याबाई शिवाजी पाटील, सासरे शिवाजी शहादू पाटील रा. भडगाव, नणंद प्रतिभा अनिल पाटील, नांदाई अनिल राघो पाटील रा. रा. अमळनेर, नणंद जया ज्ञानेश्वर पाटील आणि नंदोई ज्ञानेश्वर नामदेव पाटील दोन्ही रा. कासोदा ता.एरंडोल यांनी यांनी संगनमत करून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान, घरासाठी ६ लाख रूपये माहेरहून घेवून यावे यासाठी विवाहितेच्या अंगावरील दागीने काढून घेतले. मानसिक छळ असहाय्य झाल्याने विवाहिता जळगाव येथे राहत असलेल्या आईवडीलांकडे राहण्यासाठी आल्या. आईवडीलांना ही हकीकत सांगितल्यानंतर जिल्हा पेठ गाठून पती देवाजी पाटील यांच्यासह सासरकडील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश पाटील करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!