पेट्रोल-डिझेल २० रुपयांनी होणार स्वस्त? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. असं झाल्यास इंधनाच्या किमतीत तब्बल २० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश केल्याने तेल कंपन्यांवर लागू केलेल्या करात मोठी कपात होतील. त्यामुळे देशभरात इंधनाच्या दरात एकसमानता येईल.
म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल जवळपास सारख्याच किमतीत मिळेल. इंधनाच्या किमतीतील कपातीबाबत माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जीएसटी परिषदेच्या म्हणाल्या की, “केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तयार आहे. आता राज्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा आणि त्याचे दरही ठरवायचे आहेत”.
दरम्यान, जीएसटी दरावर सहमती झाली आणि त्यानंतर पेट्रोलियम पदार्थांवर सर्वाधिक २८ टक्के कर लावण्यात आला तरी पेट्रोलच्या किमती विद्यमान दरापेक्षा प्रति लिटर १९.७१ रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. त्याचबरोबर डिझेलचे दरही विद्यमान किमतीपेक्षा १२.८३ इतक्या रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे याचा परिणाम सरकारला मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नावर होऊ शकतो.
एक लिटर पेट्रोलवर तब्बल ३५.२९ रुपयांचा कर
सध्याच्या घडीला जर तुम्ही मुंबईत पेट्रोल खरेदी केले. तर तुम्हाला १०४.२१ रुपये मोजावे लागतात. यामध्ये तब्बल ३५.२९ रुपयांचा कर आकारला जातो. ज्यामध्ये १९.९० रुपये उत्पादन शुल्क आणि १५.३९ रुपये व्हॅट समाविष्ट आहे. उत्पादन शुल्क केंद्राकडे जाते, तर व्हॅट राज्य सरकार गोळा करते.
२० रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
पेट्रोलसोबतच डिझेलवरही कर आकारला जातो. सध्या मुंबईत डिझेलचा दर प्रतिलिटर ९२.१५ रुपये इतका आहे. यामध्ये एकूण २८.६२ रुपये कर आकारला जातो. यात उत्पादन शुल्काचा हिस्सा १५.८० रुपये आणि व्हॅटचा हिस्सा १२.८२ रुपये इतका आहे. या आधारावर, जीएसटी लागू झाल्यानंतर, पेट्रोलची किंमत ८४ रुपये आणि डिझेलची किंमत ७२ रुपये प्रति लीटर होऊ शकते.