भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

Breking : उद्यापासून पेट्रोल डिझेल तब्बल इतक्या रुपयांने स्वस्त; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहे. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केलीय. उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्यात आलेय.

उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी करण्यात आलाय. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. रब्बी पिकाचा हंगाम सुरू होत आहे. शेतीच्या कामात वापरलेली उपकरणे प्रामुख्याने डिझेलवर चालतात. अशा परिस्थितीत डिझेलचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले असून, दररोज सुमारे 35 पैशांनी महाग होत आहे. 4 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी 8 रुपयांनी वाढ झाली. काही शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपयांवर पोहोचला. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक उत्पादन शुल्क लावते. गेल्या वर्षी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.98 रुपयांवरून 32.9 रुपये प्रति लिटर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे डिझेलवरील शुल्क 31.80 रुपये प्रति लीटर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 85 डॉलरवर आल्या आहेत आणि मागणी कमी झालीय, परंतु सरकारने उत्पादन शुल्क कमी केले नाही. त्यामुळे देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलने प्रतिलिटर 100 रुपयांचा टप्पा ओलांडला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!