भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

PhonePe यूजर्सला झटका : मोबाईल रिचार्जवर भरावी लागणार प्रोसेसिंग फी !

मंडे टू मंडे न्युज : फोनपे वापरकर्त्यांना आता मोबाईल रिचार्जवर प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) व्यवहारांवर हा नियम लागू केला आहे. वापरकर्त्यांना 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर प्रति व्यवहार 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर 2 रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे, PhonePe UPI आधारित व्यवहारांवर शुल्क आकारणारे पहिले डिजिटल पेमेंट अ‍ॅप बनले आहे.

आधीपासूनच उद्योगात शुल्क वसूल केले जाताहेत
बिल पेमेंटवरील शुल्काबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, असे करणारे आम्ही उद्योगातील पहिले नाही. सर्व डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बिल भरण्यासाठी शुल्क आकारत आहेत. जर क्रेडिट कार्डच्या मदतीने बिल भरले असेल तर आम्ही त्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारतो. इतर प्लॅटफॉर्मवर, हे सुविधा शुल्क म्हणून आकारले जाते. थर्ट पार्टी म्हणून अ‍ॅपमध्ये UPI व्यवहारांच्या बाबतीत फोनपेचा सर्वात मोठा वाटा आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटींपेक्षा जास्त UPI व्यवहार झाले. यामुळे अ‍ॅप विभागातील त्यांचा बाजारातील हिस्सा सुमारे 40% झाला आहे.

विमा विकण्याचीही तयारी
PhonePe ला जीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी विमा नियामक (IRDAI) कडून देखील मान्यता मिळाली आहे. कंपनी आता येत्या काळात आपल्या 300 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना विमा-संबंधित सल्ला देऊ शकते. यासह PhonePe भारतातील सर्व विमा कंपन्यांच्या पॉलिसी विकण्यास सक्षम असेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!