भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

लोखंडी गजांनी भरलेल्या आयशरला पिकअपची जोरदार धडक, ६ ठार ५ गंभीर

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोखंडी गजांनी भरलेल्या आयशर गाडीला छोटा हत्ती पिकप गाडीने मागून येऊन जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.ही घटना नाशिक मधील अय्यप्पा मंदिराजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

पीकअप टेम्पोमध्ये १६ प्रवासी होते, जे एका धार्मिक कार्यक्रमातून परतत होते. टेम्पो सिडको भागाकडे जात असताना वाटेत टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पाठीमागून लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.प्राथमिक तपासात टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून ट्रक चालकाचीही चौकशी करण्यात येत आहे.

आयशर गाडी लोखंडी गजांनी भरली होती. तिला मागून येवून पिकअपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा त्यात  चक्काचुर झाला. अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे ते आणि जखमी हे सर्व जण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व जण नाशिकच्या सिडको सह्याद्री नगरचे असल्याची माहिती समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!