यावल

ब्रेकिंग : यावल तालुक्यात मजुरांनी भरलेली पिकप व्हॅन पलटी, १८ जण जखमी

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मजुरांनी भरलेली पिकप व्हॅन अचानक पलटी झाल्यामुळे त्यातील १८ जण जखमी झाल्याची घटना शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद गावाजवळ घडली.

अधिक वृत्त असे की, हरबरा कापणीच्या काम साठी यावल तालुक्यातील हिंगोणा येथून काही मजूर हे भालोद येथे जात होते. भालोद गावाच्या जवळ अचानक पिकप व्हॅन पलटी झाल्यामुळे शारदा मुंगीलाल बारेला (वय १०), दिपाली जगदीश बारेला (वय ८), मंगू जगदीश बारेला (वय २०), प्रमिला सयाराम बारेला (वय २१), आनंद सखाराम बारेला (५ महिने), उमेश जगदीश बारेला (वय १२ वर्ष), सखाराम गुजरिया बारीला (वय २०), ममता मांगीलाल बारेला ( वय १२), संदीप मांगीलाल बारेला (वय ६), राणू मांगीलाल बारेला (वय ४), दिलीप बारेला (वय १८ वर्ष), कविता तापा बारेला ( वय ५ वर्ष), गोदीबाई बारेला (वय ४२ वर्षे), सविता बारेला (वय ४६ वर्ष) नीरसा मांगीलाल बारीला (वय ३० वर्ष), दिनेश वैद्या बारेला (वय १२) जगदीश बारेला (वय २५). हे १८ प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले.

जखमींना शासकीय रुग्णवाहिकेमधून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमींमध्ये गोदीबाई बारेला हिला जबर मार बसला आहे. जखमींवर उपचार सुरू असून या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला या अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!