भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

शिक्षक आते भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपरी चिंचवड, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्यात स्त्रीयांवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना त्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच आहेत,बऱ्याच ठिकाणी जवळच्याच नातेवाईकांकडून अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत.अशीच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली.

एका शिक्षक आते भावाने मामाच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फटके देण्याची धमकी देत अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आला. आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेत असून पीडितेच्या आते भाऊ आहे. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अत्याचार केला .या घटनेने पीडिता भयभीत झाली. तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!