भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिकसामाजिक

पिंपरूड जि. प. शाळेत संविधान दिन साजरा

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगांव तर्फे गांधी विचार संस्कार परीक्षा पिंपरुड जिल्हा परीषद शाळेत ( तालुका – यावल ) तसेच विरोदा , आमोदा, न्हावी, वढोदा , जानोरी येथील शाळांमध्ये २६/११ रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर भारताचा संविधान दिन साजरा करण्यात आला, तसेच २६-११-२०१८ रोजी मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बहाद्दर पोलीस अधिकारी यांना यावल तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा पिंपरुड,मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तालुका यावल. आणि जयहिंद सैनिक संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक संजय सराफ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी मातोश्री फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा जयहिंद सैनिक संस्थेचे महासचिव जनार्दन जंगले,शाळेचे मुख्याध्यापक सलीम तडवी,शिक्षिका,विद्यार्थी यांनी ही यथोचित भाषणे केली, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान उद्देशिकेचे सर्वांनी वाचन केले,सर्वांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी मातोश्री फाऊंडेशन चे व्यवस्थापक विजय जंगले, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!