पितृपक्ष : दिवंगत पूर्वजांचे पूजन करण्याचा पंधरावाडा, श्रद्धच्या तिथी व इतर माहिती जाणून घ्या ….
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रुढी-परंपरां नुसार हिंदू धर्मात मध्ये महत्त्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा आज १८ सप्टेंबर पासून सुरू होत असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात. पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात.
पितृपक्षाला श्राद्धपक्ष असंही म्हणतात. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं. जे व्यक्ती श्राद्धकर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी समाजमान्यता आहे.
हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात काही कामे करणं अशुभ मानलं जातं. तर, काही कामं शुभ मानली जातात
पितर पाठ म्हणजे काय?
या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज) आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष (पंधरवडा) अशा पितृकार्याला योग्य समजला जातो
पितृ देवता कोण आहेत?
पितृ देवता हे आपल्या पूर्वजांचा संदर्भ देत नाहीत, तर त्या देवता, ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला उत्तम गाथीकडे प्रस्थान केले आणि प्रेताच्या अंधकारमय प्रदेशातून मार्ग दाखवला . प्रत्येक आत्मा, जो उपाधी किंवा मनुष्य जन्माचे रूप धारण करतो, तो पाच ऋण किंवा रुणांसह जन्माला येतो: देवा रुणम.
श्राद्ध – हिंदू माणूस त्याच्या नातेवाईकाचे श्राद्ध नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, पितृपक्षातील त्याच तिथीस करतो. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण.
पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांसाठी मानण्यात आला आहे. या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते. श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळाला मृत्यू संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आला आहे. यंदा पितृपक्षाचा पंधरवडा कधीपासून सुरु होतोय? तर्पण करण्याची योग्य तिथी कोणती? जाणून घेऊ या….
शास्त्रानुसार श्राद्ध करण्याची योग्य वेळ
पितृपक्षात सर्व देवी-देवतांची पूजा केली जाते. तसेच पितरांची पूजाही केली जाते. पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत उत्तम काळ मानण्यात आला आहे. हिंदू पंचांगात अभिजीत मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते. या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करुन दक्षिणा द्यावी.
श्राद्धाच्या तिथी
१७ सप्टेंबर- मंगळवार पौर्णिमा श्राद्ध
१८ सप्टेंबर – बुधवार प्रतिपदा तिथी (पितृपक्षाला सुरूवात )
१९ सप्टेंबर- गुरुवार द्वितीया तिथी
२० सप्टेंबर – शुक्रवार तृतीया तिथी
२१ सप्टेंबर- शनिवार चतुर्थी तिथी
२२ सप्टेंबर- सोमवार पंचमी तिथी
२३ सप्टेंबर- सोमवार षष्ठी आणि सप्तमी तिथी
२४ सप्टेंबर – मंगळवार अष्टमी तिथी
२५ सप्टेंबर- बुधवार नवमी तिथी
२६ सप्टेंबर- गुरुवार दशमी तिथी
२७ सप्टेंबर- शुक्रवार एकादशी तिथी
२९ सप्टेंबर- रविवार द्वादशी तिथी
३० सप्टेंबर- सोमवार त्रयोदशी तिथी
१ ऑक्टोबर- मंगळवार चतुर्दशी तिथी
२ ऑक्टोबर- बुधवार सर्व पितृ अमावस्या
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कराश्राद्धपक्षातील गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं.
या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जातं.
ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं, असं म्हणतात.
या काळात लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्ये करण्यास मनाई आहे.
पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं टाळावं.
या काळात केस कापणं, नखं कापणं आणि दाढी करणं टाळावं, असं सांगितलं जातं.
या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं.