भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ रेल्वे स्थानकावर १६ मार्च पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l होळी सणाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा विचार करता भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटावर
तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. तसेच नाशिक व मनमाड या दोन्ही रेल्वे स्थानकावर ही अशीच बंदी घालण्यात आली आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा विचार करता भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटावर तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानकांवरही प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिक व वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांसाठी यातून सूट देण्यात आली आहे.

या मुळे प्लॅटफॉर्म वर होणारी गर्दी कमी होईल व प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा या उद्देशाने १० ते १६ मार्च दरम्यात भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.प्रवाशांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!