PM Kisan : PM किसान योजनेत मोठा बदल, योजनेच्या २० व्या हप्त्यापूर्वी सरकारचा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. हा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप नेमकी तारीख जाहीर झालेली नाही.
दरम्यान, पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सरकारने PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे हप्ता मिळण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. आता हप्ता न मिळाल्यास शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही तुमच्या अडचणी किंवा तक्रारी नोंदवू शकता. हे अधिकारी मोबाईल नंबर व ई-मेलद्वारे उपलब्ध असतील आणि त्यांची माहिती तुम्हाला ऑनलाईन सहज मिळू शकते.
ऑनलाईन काही मिळवावी नोडल अधिकाऱ्यांची माहिती?
१. सर्वप्रथम PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in) भेट द्या.
२. त्यानंतर ‘Farmer Corner’ विभागातील Search Your Point of Contact (POC) या पर्यायावर क्लिक करा.
३. येथे तुमचे राज्य निवडा.
जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी Search District Nodal या पर्यायावर क्लिक करा.
४. तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि ‘Search’ बटण दाबा.
पीएम किसान ही योजना १ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली होती. याचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्याकडे २ हेक्टरपर्यंत शेती जमीन आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.