पाल येथे पीएम किसान सन्मान समारोह व भव्य शेतकरी परिसंवाद कार्यक्रम संपन्न
पाल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्या वतीने भागलपूर बिहार राज्य येथून पीएम किसान सन्मान निधीच्या 19 वा हप्ता वितरण दुरस्थ प्रणालीद्वारे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यानिमित्ताने पाल येथील कृषी विज्ञान केंद्र येथे भव्य शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून म्हणून भारताच्या केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्रीमती रक्षाताई खडसे (युवक कल्याण व क्रीडा) उपस्थित होत्या.
याप्रसंगी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण काम करत असलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन प्राप्त करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक नवतंत्रज्ञान आत्मसात करून आपण शेतीमध्ये प्रगती करावी असे आवाहन श्रीमती रक्षा खडसे यांनी केले या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांना वेब कास्टिंग द्वारे मार्गदर्शन केले.कृषी संशोधनाच्या माध्यमातून नवीन वाण नवीन उच्च उत्पादन देणारे बियाणे त्याच पद्धतीने देशांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या अनुषंगाने कृषी विभाग हा प्रयत्नशील आहे अशा पद्धतीचे आश्वासन त्यांनी त्यांच्या मनोगता मध्ये व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बबनराव काकडे (प्रांताधिकारी फैजपूर) बंडू कापसे (तहसीलदार रावेर, संस्थेचे अध्यक्ष अशोक झांबरे, कुरबान तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव) बबनराव काकडे (प्रांताधिकारी फैजपूर) बंडू कापसे (तहसीलदार रावेर) भरत वारे तालुका कृषी अधिकारी यावल भाऊसाहेब वाडके तालुका कृषी अधिकारी रावेर, नंदू महाजन, पद्माकर महाजन, महेश चौधरी, सुरेश भाऊ धनके धनंजय चौधरी, प्रभात चौधरी, सुधाकर झोपे,प्रशांत महाजन आदी मान्यवर प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते .
सोबतच व्यासपीठावर श्रीमती हजरत आई तडवी सरपंच ग्रामपंचायत पाल श्रीमती ललिता ताई पवार उपसरपंच ग्रामपंचायत पाल हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक महेश महाजन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी कृषी विज्ञान केंद्र राबवीत असलेल्या शेतकरी हिताच्या योजना व उपक्रमाविषयी माहिती देऊन कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर धीरज नेते व आभार प्रदर्शन प्रा. अतुल पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी व कार्यकर्ता परिवार यांनी मेहनत घेतली.