भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

PMO कडुन कोरोनाला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे PMOच्या नेतृत्वात काही तज्ज्ञांचे गट त्यावर अहवाल तयार करत असून त्यांच्या अहवालानंतर सरकार मोठे निर्णय घेणार आहे. महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना हा काही लेगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या गटाकडुन तयार करण्यात येत असलेला अहवाल थेट पंतप्रधानांना दिला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या टास्क फोर्सच्या कामकाजाबद्दल माहिती घेत असून उपचाराची दिशा, औषधं, नव्या आरोग्य सुविधा, संशोधनासाठीचे उपाय, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थचक्र  पुन्हा रुळावर आणणे अशा सगळ्याच गोष्टींवर हे तज्ज्ञ शिफारशी करणार असून त्यानंतर सरकार प्रत्येक विभागासाठी दूरगामी निर्णय घेणार आहे.

ताप येणं हे कोरोनाची लागण होण्याचं प्रमुख लक्षण कधी  नव्हतं. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित अभ्यासातून हे स्पष्ट होते. मार्च-एप्रिल या कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात केवळ 17 टक्के रुग्णांना ताप होता. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात 10 लाख लोकांमागे 11,485 टेस्ट केल्या जात आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे, देशात शुक्रवारपर्यंत 1,58,49,068 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 4,20,898 टेस्ट करण्यात आल्यात. तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे. देशात रुग्णांच्या मृत्यू दरात घसरण झाली असून सध्या त्याचं प्रमाण हे 2.35 एवढं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!