पाल येथून चोरी गेलेल्या युनिकॉन दुचाकी सह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पाल, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज विनोद जाधव l रावेर तालुक्यातील पाल येथील मुख्य रस्त्यावरून हिरो होंडा कंपनीची महागडी युनिकॉन चोरट्याने चोरून नेली होती. रावेर पोलिसांनी मंगरूळ येथील दुचाकी चोरट्याला अटक करीत पाल येथून चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे.
पाल पोलीस दूर शेत्र भागातून भर दिवसा दुपारी दोन वाजेच्या दरम्यान गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवीन विकत घेतलेली युनिकॉन होंडा कंपनीची दुचाकी MH19EM 8844 केशव महेंद्र जाधव यांच्या मालकीची गाडी पाल येथून पोलीस स्टेशन समोर मोटर वायडिंगचे दुकानावर उभी असताना चोरून नेली होती. रावेर पोलिसांनी मंगरूळ येथील कालू बादशाह बिलाला (१८, मंगरूळ) या दुचाकी चोरट्याला अटक करीत पाल येथून चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे.
याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रावेर पोलिसांना कालू बादशाह बिलाला याच्याकडे चोरीची दुचाकी असत्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यानी चोरीची दुचाकी काढून दिली.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सोनू तडवी, महेश मोगरे, अतुल लोहार आदींच्या पथकाने केली.