भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची उचलबांगडी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव एम आय डी सी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी झाल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव येथील इच्छादेवी चौकात झालेले अवैध गॅस भरणा प्रकरण एम आय डी सी पोलिस निरीक्षक याना चांगलेच भोवले. जळगाव येथील इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता. यावरून सर्वत्र टीका करण्यात आली. त्या वेळी लागलीच दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आता या मुळे जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.

सूत्रांकडून मिळालेली  माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून दत्तात्रय निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ११ जण भाजले गेले होते. यातील सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जोरदार टीका सुरू होती. घटने नंतर लागलीच दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

घटना घडली त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. आचारसंहिता संपताच बदली विषयी हालचाली गतिमान झाल्या. अखेर गंभीर घटनेची दखल घेत शनिवारी ७ डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. येथील पदभार दुय्यम अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!