पन्नास हजारांची लाच मागितली, पोलिस अधिकारी अडकला एसीबी च्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भंगार व्यापारी असलेल्या तक्रारदार यांचे भावाने चोरीचे नळाचे वॉल भंगारात १५ हजार रुपये देवून खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्हयातून सुटायचे असेल तर पोलिस उप निरीक्षक राजेंद्र सोपान घुमरे, नेमणूक नाशिक शहर यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करून त्यांचे सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती ५०००/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
म्हणून राजेंद्र सोपान घुमरे वय ५६ वर्षे, व्यवसाय-नोकरी (सहा. पोलीस उपनिरीक्षक, वर्ग-३, गुन्हे शाखा, युनिट २, नाशिक शहर,नाशिक ) रा. प्लॅट नं. ४, राधा शिल्प अपार्टमेंट, गणेशनगर, द्वारका नाशिक .यांचे विरुध्द अंबड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही क्राइम ब्रांच युनिट २ नाशिक शहर चे आवारात करण्यात आली .
सापळा अधिकारी अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नाशिक , श्रीमती मीरा अदमाने
पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नाशिक, पोहवा /संदीप वणवे
पोहवा/ योगेश साळवे,पोना/ अविनाश पवार, चालक पोहवा/संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली .