५० हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी जळगाव एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l वाहनावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास जळगाव एसीबी ने भडगाव पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
या बाबत सविस्तर असे की, यातील ४० वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापुर्वी भडगांव पोस्टेला अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे . तक्रारदार यानां सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २,६०,००० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दिनांक २५/०७/२०२४ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २,६०,००० रु मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष ५०,००० /- रुपये लाच रक्कम घेताना. किरण रविंद्र पाटील वय ४१, व्यवसाय नोकरी पोलिस हवालदार ब. न. ७२ नेमणुक भडगांव पोलिस स्टेशन वर्ग ३. याला रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेवर भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल कालच भडगाव पोलिस स्टेशन चे हवालदार किरण रविंद्र पाटील यांना दि. २५ जुलै रोजी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला होता.