जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान जुगाऱ्याचा मृत्यू
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जुगार अड्ड्यावर पोलिस कारवाई करण्यासाठी गेले मात्र पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्यांमधील ब्रायन रुडाल्फ गिअर. वय ५४ वर्ष. याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि त्यात ब्रायन चा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यामधील नाना पेठे तील आहे.
पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठ मधील क्राईस्ट चर्च समोरील एका सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची एक टीम त्या ठिकाणी छापा टाकण्यास गेली असता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर दरवाजावर थाप टाकली आणि आतमधील एका व्यक्तीने दरवाजा उघडला. व पोलिसाना पाहताच, त्याला पोलीस आल्याचे दिसताच त्याने दार लावून घेत पोलीस आले -आले असा आवाज दिला व एकाच गोंधळ उडाला.
यामुळे आतमध्ये जुगार पत्ते खेळत असलेल्या लोकांनी गॅलरीमधून पळापळ करत त्यांची धांदल उडाली. या वेळी
जुगऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली . फ्लॅटमध्ये असलेल्या व्यक्तींनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. काहींनी इमारतीच्या पाईपवरून तर काहींनी इकडे तिकडे उड्या मारल्या मात्र त्यावेळी ब्रायन रुडाल्फ गिअर याने पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ब्रायन रुडाल्फ गिअर याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तर संबधित जुगार अड्डा चालकाचा व जुगार खेळणाऱ्या जुगऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.