Loudspeaker: भोंग्यांच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन मशिदीनवर कारवाई
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता याप्रकरणी मुंबईत लाऊडस्पीकरबाबत (Loudspeakers) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबईतील लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे.
मात्र वांद्रे येथील नुरानी मशिदीच्या व्यवस्थापनावर नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम ३७ (१), (३), १३५ नुसार तक्रार दाखल केली आहे. कायदा आणि ध्वनी बंदी नियमांचे कलम ३३ (R)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे पालन न केल्याप्रकरणी दोन जणांवर कलम 188, 34 भादंविसह 33 (1) म पो का 1951,33 (1)(त)(3) म पो का ,131 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.