आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई : ५०० रुपयांच्या कोऱ्या करकरीत बनावट नोटा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार पोलिसांनी ए-वन सागर हॉटेलजवळ सापळा रचला. या वेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय ३४, रा. मोमीनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय ३३, रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. ३१, बुरहानपूर, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी ५०० रुपयांच्या २,००० बनावट नोटा (एकूण किंमत १० लाख रुपये), दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव परिसरात केली. मालेगाव पोलिसांना बुधवार दि. ऑक्टोबर रोजा गोपनीय माहिती मिळाली होती .

मुंबई-आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर करण्यात आलेल्या या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मौलानाचाही सहभाग; आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय
ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य करतो, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोटांच्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे आणि त्या कुठून आणल्या व कुठे विक्रीसाठी नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच बनावट नोटांचा मोठा साठा जप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बया प्रकरणात बनावट चलन रॅकेटचे मूळ आणि मोठे जाळे बाहेर येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीर संधू आणि पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, शिपाई गणेश जाधव आणि मोरे यांनी सहभाग घेतला.


