भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात राजकीय घडामोडींना वेग, तब्बल ५ तास रंगली भाजप कोअर कमिटीची बैठक, घाडलं काय नेमकं ?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l काल रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईतील सागर या निवासस्थानी झाली. या कोअर कमिटीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्राथमिक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. तसेच पुन्हा एक कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी दिली. तसेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना याबसमाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे, यावर चर्चा केली. ज्या ठिकाणी कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा काम करणार अजून चांगलं काम करणार आणि जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार,असेही त्यांनी सांगितले.


त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा केली. आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेईल. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झालेली नाही. तो सरकारचा विषय आहे ही संघटनात्मक बैठक होती.

काय रणनीती असेल विधानसभेसाठी?
मविआने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वचन दिल्यानुसार काम करतील. त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल. केंद्रातील आणि राज्यातील सरकारी का विचाराचा असेल तर राज्यातील जनतेला फायदा होतो. केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास आघडी सरकार येणार म्हणजे केंद्रातली काम पूर्ण पणे बंद करणे. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल. ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत. मात्र डबल इंजिन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो. जसं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालं. नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते. मात्र उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं. आम्हाला नरेंद्र मोदी नको, आम्हाला मोदीजींच्या सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते. म्हणून जनतेचे नुकसान झालं. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!