ठाकरेंना धक्का : शिंदे गटाचे राहूल शेवाळे गटनेते, तर भावना गवळी प्रतोदपदी कायम, लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुख्यमंत्री शिंदे गटाच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात यावी, तसंच मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांना कायम ठेवण्यात यावं अशी मागणी केली होती शिंदे गटाची ही मागणी मान्य केल्याची लोकसभा अध्यक्षानी मान्य केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला आता केंद्रातही एक मोठा हादरा बसला आहे.
राज्यच्या राजकारण शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर राजकिय वातावरण तापले आहे. आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी बिर्ला यांची भेट घेऊन विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची सभागृहात पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आता राहुल शेवाळे राहणार असून प्रतोद म्हणून भावना गवळी कायम राहणार आहे. १२ खासदारांनीही दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा केली आणि आपण एनडीएचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं होते. दरम्यान आता या शिंदे गटाला खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी हिरवा कंदील दाखवल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.
शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील १२ खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. शिंदे गटाला लोकसभेतील शिवसेनेच्या १२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यात राहुल शेवाळे, भावना गवळी, कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे या खासदारांचा समावेश आहे.