भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, या नेत्यांना संधी

Sharad Pawar’s NCP first candidate list announced : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. 

कोणाला कोठून उमेदवारी 

वर्धा     – अमर काळे
दिंडोरी   – भास्करराव भगरे
बारामती -सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत एका महिलेला स्थान देण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी दिली गेली आहे. शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे तर नगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही पहिली यादी असून अजून एक यादी जाहीर होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत पवार गटाच्या वाट्याला किती जागा येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रावेरच्या जागेवर सस्पेन्स कायम

दरम्यान, पवार गटाच्या यादीत रावेरच्या जागा घोषित करण्यात आलेली नाही. रावेरमधून लढण्यास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!