भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ती ४ कोटीचीच संपत्ती जप्त : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार- अनिल देशमुख

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, या संपत्तीची बाजारभावा प्रमाणे आजची किंमत ही 300 कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुख यांची 4 नाही तर तब्बल 300 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केल्याचं बोललं जात आहे. याबाबत स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपली 300 कोटी नाही तर फक्त 4 कोटीची संपत्ती ईडीने तात्तपुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले.

ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात 2 कोटी 67 लाख रुपयांची जमीन 300 कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय. तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय.

अनिल देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे. दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख रुपये आहे. त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात देशमुखांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!