हसन मुश्रीफ कुटूंबीयांचे शेकडो कोटींचे घोटाळे : सोमय्यांचा मनी लॉंड्रिंगचा गंभीर आरोप
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हन : उद्या इडिकडे अधिकृत तक्रार
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असं सोमय्या म्हणाले. तर उद्या अर्थातच 14 सप्टेंबरला इडिकडे तक्रार करेल, तर तर दुसरीकडे दिल्लीत अर्थ मंत्रालयात ही सोमय्या हातात अधिकृत तक्रार करणार आहेत. तर नाविद मुश्रीफने देखील शेल कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. असा देखील आरोप करण्यात आलाय.
काय म्हणाले किरीट सोमय्या
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.
नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल
बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे.नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल आहे त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.
किरीट सोमय्या यांनी केला होता खुलासा?
भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी यावेळी शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भावना गवळी, छगन भुजबळ अनिल परब यांना लक्ष्य केलं. तर, पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपबद्दल काय भूमिका आहे, असं विचारलं असता राज्य सरकारनं त्याप्रश्नी कारवाई करावी, असं म्हणत किरीट सोमय्यांनी प्रश्नाला बगल दिली होती.