भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकामहाराष्ट्रराजकीय

नगराध्यक्ष, सरपंच पुन्हा लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केलीयं. तसेच बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आल्याने त्यांना मतदान करता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेला निर्णयही बदलण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला होता. परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. आज पुन्हा शिंदे-भाजपा सरकारनं हा निर्णय पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र योजनेचा दुसरा टप्पा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ही योजना नगरविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नगरपरिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जात होती. त्यांना पेशन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही हा निर्णय घेतला होता. पण मागच्या सरकारने तो रद्द केला होता. आम्ही हा निर्णय घेतला आहे. 3600 लोकांना लाभ मिळणार. 1800 अर्ज आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!