माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार : संजयकाका पाटील
सांगली, प्रतिनिधी : माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, भाजपच्या एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले.
मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो, असा आरोप सातत्याने होतो. केंद्रीय यंत्रणा निवडकपणे कारवाई करतात. चौकशी सुरु असलेला एखादा नेता भाजपमध्ये आला की त्याला अभय मिळते, असे सर्रास म्हटले जाते. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे झालेला वाद ताजा असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले आहे. माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले.
ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले. आता संजकाका पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या दाव्याला एकप्रकारे पुष्टी मिळताना दिसत आहे.