भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीयव्हिडिओ

Video। नाराज आमदार फुटू नये म्हणून ” ‘थांबा रे ! आपलं सरकार येतयं’ असा फडणवीसांचा आटापिटा– खडसे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पडण्याची भविष्यवाणी या आधी देखील केली परंतु तसे काहीच झाले नाही.आतापर्यंत या तारखेला सरकार पडेल, अशा वल्गना केल्या आहेत. आपल्या पक्षातील आमदार फुटू नयेत म्हणून ते जीवाचा आटापीटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. मात्र, त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सांगूनही सरकार पडले नाही. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे, हे सरकार पडणार नाही. जरी हे सरकार पडले तरी राष्ट्रपती राजवट लागू होईल. तसे झाल्यास पुन्हा आठ दिवसात आम्ही 171 आमदार उभे करू, अशी असे खडसे यांनी म्हटले आहे. भाजपचे काही आमदार त्यांच्यावर नाराज आहेत. नाथाभाऊ दिवसा भाजपातून गेले तसे नाराज आमदार भाजपातून जाऊ नये, यासाठी थांबरे आपले सरकार येत आहे असा प्रकार सुरु असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

राज्यातील भीषण कोरोना परिस्थितीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मीदेखील राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळलो नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. ते रविवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशावेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!