“मंदिरात गेले अन् प्रसाद संपला अशी अवस्था”, गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : पंगत बसली आणि बुंदी संपली असे सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली, अशी अवस्था खडसेंची झाली आहे” असे सांगत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते तसंच नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना डिवचले आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली. त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे”, सोशल मीडियावर अनेक गमती घडतात मात्र खडसेंबाबत योगायोग म्हणावा लागेल”, असं गिरीश महाजन म्हणालेत.
“एकनाथ खडसे यांनी नुकतंच विधान परिषदे शपथ घेतली. त्यांना माझ्या शुभेच्छा मात्र, खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली. त्यामुळे खडसेंना आता-आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. असं गिरीश महाजन म्हणालेत.