भाजपला धक्का : जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंची बिनविरोध निवड निश्चित
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत छाननीअंती बाद झालेल्या भाजप उमेदवारांच्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी माजी आमदार स्मिता वाघ, मुक्ताईनगर येथील नाना पाटील, माधुरी अत्तरदे, दिलीप पाटील याच्यासह अन्य चार जणांच्या हरकती फेटाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननी प्रक्रियेत भाजपच्या स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवैध ठरवण्यात आले होते. उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. मंगळवारी यावर कामकाज देखील झालं होतं. त्यानंतर २८ रोज गुरुवारी विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला. या निर्णयात भाजपच्या उमेदवारांना मोठा झटका बसला आहे. भाजपच्या ७ सात जणांचे अपील रद्द करत याचिका खारीश करण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाला. अमळनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील तर मुक्ताईनगर मधून नाना पाटील यांचा अर्ज बाद झाल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचं निश्चित झालं. मात्र, अर्ज बाद झालेले उमेदवार खंडपीठात अपील करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.