मी एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय : केंद्रीय यंत्रणां हातातील बाहुल्या झाल्याय राज ठाकरेची टीका
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
पुणे, समीर देशमुख : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी माझ्या मागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन असे म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
भोसरी जमीन प्रकरणी ईडीने नुकतीच ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल ९ तास कसून चौकशी करण्यात आली होती. तुम्हाला नको असलेल्या माणसाला संपवण्यासाठी तुम्ही या यंत्रणांचा वापर कराल. ज्यांनी खरे गुन्हे केले आहेत ते मोकाट फिरत आहेत. ज्यांची काही चुक नाही त्यांच्यावर कारवाई होत आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते पुणे दौऱ्यावर असून यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.