Video। माझाही फोन टॅप करण्यात आले, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे वक्तव्य केले मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझे फोन टॅप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फोन टॅप करण्यात आल्याचं सांगितलंय.
मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझा फोन टॅप केला जातो, असा मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना त्या कालखंडात मी एका वृत्त वहिनीला देखील आधी माझा फोन टॅप होत होता, अशी मुलाखत दिली होती. त्यामुळे तेव्हापासून माझी तक्रार आहे. त्यावेळेस माझ्या तक्रारीनंतर ॲडिशनल चीफ सेक्रेटरीनी चौकशी केली होती, त्या कालखंडापासून तर आतापर्यंत मला शंका आहे की माझा फोन टॅप होत होता. तसे मला जाणवत होते. त्यामुळे त्यातील तथ्य काय आहे हे मी सरकारला पत्राद्वारे विनंती करणार असल्याचंही एकनाथ खडसेंनी सांगितलंय.