राजकीयराष्ट्रीय

Breaking : मोदी सरकारमधील ४ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळापूर्वी राजीनामा

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोदी सरकारमधील ४ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा दिल्याचे वृत्त समजत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. 

दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि देबाश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशकं यांनी प्रकृतीच्या कारणामुळं राजीनामा दिला असल्याचं कळतं आहे. पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांनी देखील राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा मागितला. पश्चिम बंगालमध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी देखील राजीनामा दिला आहे. कर्नाटकाची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. कर्नाटकातील भाजपमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सदानंद गौडा यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विषयी काही भाजप आमदारांनी नाराजी दर्शवली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!