भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ड्रग प्रकरणी नवाब मलिकांचा जावायास एनसीबीने चौकशीला बोलावले

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (प्रतिनिधी)। एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत नवाब मलिकांच्या जावयाचे नाव उघड झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उ़डण्याची शक्यता आहे. 

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे लग्न समीर खान यांच्याशी झाले आहे. समीर यांनी 200 किलो ड्रगमधील मुख्य आरोपी करन सजनानी याच्याकडून 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. दोघांमध्ये गुगल पे वरून व्यवहार झाला होता. यामुळे एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग खरेदी-विक्री झाल्याचा संशय आहे. याच्या चौकशीसाठी समीर खानला एनसीबीने बोलावले आहे. ड्रग प्रकरणावरून एनसीबीच्या रडावर अनेक लोक आहेत. मंगळवारी प्रसिद्ध मुच्छड पानवाला रामकुमार तिवारीला अटक करण्यात आली होती. यानंतर पानवालाचा मालक जयशंकर तिवारी आणि रामकुमार यांची काही तास चौकशी करण्यात आली. हे दोघे भाऊ आहेत. तिवारी बंधू दक्षिण मुंबईतील पॉश भाग कँप कॉर्नरवर पानाची दुकान चालवितात. दोघेही सहा सहा महिने हे दुकान सांभाळतात. या पान शॉपवर मोठमोठ्या बॉलिवूड हस्ती पान खाण्यासाठी येतात. यामुळे आतापर्यंत बचावलेले बॉलिवूडकर ड्रग प्रकरणात समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!