भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमुक्ताईनगरराजकीयव्हिडिओ

Video। फरदापुराचा सर्व इतिहास माहित, गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं– एकनाथ खडसेंच मोठं विधान

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, अक्षय काठोके : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेची गिरीश महाजनवरील व्हायरल ऑडियो क्लीपवरुन टोल बाजी सुरु झाली असून “माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता”, असं खडसे म्हणाले आहेत. तसेच गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे

“मी जे ऑडिओ रेकॉर्डमध्ये बोललो आहे, जामनेर मतदारसंघातून मला नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्‍यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या तालुक्यात आहेत. गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. 1994, 1995 मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही”, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. “मुख्यमंत्रीपदाचे स्वप्ने पाहणे काय गैर आहे? गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. पहिले आपल्या मतदारसंघात पाहा”, असं सडेतोड प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!