झोटिंग समिती फास होता, खडसेंना केवळ त्रास होता– नाना पटोले
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, वृत्तसंस्था : देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग कमिटीचा अहवाल गायब आहे. त्यावरुन पटोलेंनी हल्लाबोल केला.
इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल पटोलेंनी केला. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकणं माझं काम आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीदेखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं.