भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी खुर्द विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रभाकर महाजन, व्हा. चेअरमनपदी दिलीप पाटील

बलवाड़ी, मंडे टु मंडे न्युज, आशीष चौधरी | खिर्डी खुर्द येथील विविध सहकारी कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड नुकतीच पार पडली. यामध्ये प्रभाकर महाजन यांची चेअरमनपदी तर दिलीप पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व सत्कार करण्यात आला. यावेळी निळकंठ बढे, डॉ. सुरेश महाजन, टिना पाटील, विजय धनराम, अशोक पाटील, ब्रिजलाल कोळी, तसेच संस्थेचे सचिव अविनाश पाटील व शिपाई सतीश फेगडे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करत संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रभाकर महाजन व दिलीप पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी पारदर्शक व विकासाभिमुख काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!