भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावदा शहरातील पाणी पुरवठा नियमित एक दिवसांआड करावा– भाजपचे  प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सावदा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | सावदा नगरपालिका हतनुर धरणाच्या बॅक वॉटर मधून पाण्याची उचल करून शहरात पाणीपुरवठा करते. प्रशासनाकडून भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईस सामोरे जाण्याचे हेतूने शहरात सध्या होणारा एक दिवसाचा पाणीपुरवठा ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत  भारतीय जनता पक्ष सावदा शहरच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी फैजपूर तथा प्रशासक नगरपालिका सावदा यांना शहराध्यक्ष जे. के. भारंबे यांच्या लेटर हेडवरती निवेदन देण्यात आले.

सावदा भाजप शहराध्यक्ष जे. के. भारंबे यांच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, नगरपालिकेने केलेल्या पाण्याची उचल धरणाच्या जलाशयात असणाऱ्या पाणीसाठापैकी अत्यल्प प्रमाणात  आहे तसेच दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान वाढीमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असते परंतु यावर्षी राज्यात संपूर्ण मे महिना अवकाळी पाऊस सुरू असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण नगण्य असणार आहे.

या बाबींचा विचार करता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार अन्यायकारक आहे. यावरही प्रशासनास पाण्याचे नियोजन करावयाचे झालेच तर सावदा शहरांमध्ये अनेक व्यावसायिक तथा निवासी प्रयोजनार्थ नागरिकांनी अनधिकृत रित्या विनापरवानगी खोदलेल्या कुपनलिकांचे व विहिरींचे प्रशासनामार्फत अधिग्रहण करून त्यांचे वर कारवाई करण्यात यावी व त्या पाण्याचा वापर सावदा शहरातील नागरिकांसाठी करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी शहराध्यक्ष जितेंद्र किसन भारंबे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नितीन खारे, शिवाजी भारंबे, गजानन भार्गव, अतुल चौधरी, महेश भारंबे, राकेश पाटील, संजय चौधरी, चेतन नेमाडे, अमोल पासे, सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले यांची उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!