भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

नारळी सप्ताह निमित्त तयारी अंतिम टप्प्यात : कुंभारखेडा येथे फुलणार दि. १७ पासून भक्तीचा मळा

कुंभारखेडा.ता.रावेर- मंडे टू मंडे न्यूज. प्रा योगेश कोष्टी | यावल व रावेर तालुका सकल हिंदू समाज आयोजित श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर फिरता नारळी सप्ताह ची तयारी अंतिम टप्प्यात आले असून कथास्थळ कुंभारखेडा येथे भक्तीचा मळा फुलण्याच्या मार्गावर आहे.श्री महामंडलेश्वर आचार्य जनार्दन जी महाराज हे याठिकाणी मार्गदर्शक म्हणून कायम थांबून असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.


येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामाची तसेच भोजनाची व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी कुंभारखेडा तसेच परिसरातील स्वयंसेवक रात्रदिवस या ठिकाणी कार्यात मग्न आहे. दि. १७ पासून युवकांसाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि दररोज सकाळी १० ते १२ आणि रात्री ८ ते १० हरी कीर्तनाचे आयोजन केले असून सप्ताहाला लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्यामुळे ग्रामस्थांकडून येणाऱ्या भक्तगणांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी लक्ष दिले जात असून कार्यक्रमस्थळी आतापर्यंत यावल रावेर मतदार संघाचे आमदार श्री अमोल जावळे, उपविभागीय अधिकारी श्री बबनराव काकडे, उपजिल्हाधिकारी दीपा जेधे मॅडम, मुक्ताईनगर विभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी तसेच सावदा पो स्टे चे निरीक्षक , उपनिरीक्षक तसेच कर्मचारी यांनी भेटी दिल्यात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!