भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

खोटा गुन्हा दाखल करणे पडले महाग, वरणगाव पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली !

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l ट्रक चोरी गेल्याचा बनाव करत  ट्रक चालकासह वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल करणे चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, वरणगाव येथे ट्रक चालक वास्तव्यास असून तो कर्जबाजारी झाला होता. तसेच ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकले होते. त्याने वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची खोटी तक्रार दिली होती, त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केला होता. हा ट्रक चालकाने धुळे येथील एका भंगार व्यवसायीकाकडे नेवून तो मोडला. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. त्यानंतर चालकासह पोलिसांनी संगनमत करुन त्या ट्रकचा इन्शुरन्स देखील पास करुन घेतला होता. त्यातून मिळालेले सात लाख रुपयांची रोकड दोघांची हडप केल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाली होती.संपुर्ण घटना समोर आल्यानंतर या प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!